शिवाजी पार्कसाठी शिवसेना हायकोर्टात! दसरा मेळाव्यासाठी परवानगी कुणाला मिळणार? मुंबई हायकोर्टात आज सुनावणी!

Tv 9 | 2 weeks ago | 22-09-2022 | 08:05 am

शिवाजी पार्कसाठी शिवसेना हायकोर्टात! दसरा मेळाव्यासाठी परवानगी कुणाला मिळणार? मुंबई हायकोर्टात आज सुनावणी!

मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत (Dussehra Melawa, Shivaji Park) आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेच्या (Shivsena News) वतीने पालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र बीएमसीकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. अखेर जी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टात (High Court on Shivaji Park) होणाऱ्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.शिवसेना नेते अनिल देसाई यांनी बुधवारी हायकोर्टात धाव घेतली. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी म्हणजेच आज सुनावणी पार पडेल. या याचिकेद्वारे शिवसेनेनं आता दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा, यासाठी अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. हायकोर्टानेही जर परवानही नाकारली तर शिवाजी पार्कवर घुसून दसरा मेळावा करु, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने याआधीच देण्यात आला होता.बुधवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा उल्लेख केला. या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं? दसरा मेळाव्यासाठी हायकोर्ट शिवसेनेला परवानगी देतं की नाकारतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.1966 सालापासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा दरवर्षी घेतला जातो आहे. बीएमसीनेही दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगीही दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे दसरा मेळाव्यावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झालाय.सध्या बीएमसीवर प्रशासकाच्या नेतृत्त्वाखाली कामकाज सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बीएमसीकडून शिवसेनेला सहजासहजी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणं कठीण असल्याचं जाणकारांकडून सांगितलं जात होतं. आता नेमकं तेच पाहायला मिळतंय.

Google Follow Image