ठाकरे गटातील शिवसेनेच्या महिला नेत्यांत गटबाजी, दोन गट कोणते?

Tv 9 | 3 days ago | 25-11-2022 | 03:05 am

ठाकरे गटातील शिवसेनेच्या महिला नेत्यांत गटबाजी, दोन गट कोणते?

मुंबई – शिवसेनेतील महिला नेत्यांत गट तट पडल्याचं बोललं जातंय. काल एका उपनेत्या महिलेनं ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. या चर्चेतल्या गटबाजीची खुद्द उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्याची माहिती आहे. दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश घेतला. त्यानंतर आता उपनेत्या आशा मिमाडी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला. यानिमित्तानं ठाकरे गटामधील महिलांची नाराजी पुन्हा बाहेर येऊ लागली.दीपाली सय्यद यांनी ठाकरे गट सोडताना थेट रश्मी ठाकरे यांच्याकडं बोट दाखविलं होतं. मुंबई महापालिकेतील खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना आहे. निलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. या सर्वातील महत्तवाचा सुत्रधार रश्मी वहिनी असल्याचा आरोप दीपाली सय्यद यांनी केला होता.उपनेत्या आशा मिमाडे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या मिना कांबळे यांच्याकडं बोट दाखविलंय. ठाकरे गट सोडण्याचं दुख होतं. मात्र, काही महिला नेत्यांकडून दुय्यम वागणूक मिळाल्याचा आरोप त्यांचा आहे.बाहेरचे गेलेले लोकं गद्दार नाहीत. मी गद्दार नाही. ह्या गद्दार आहेत. ही एक नंबरची खोटारडी बाई आहे. खोटं बोलणं तिला जमतं. चांगल्या साड्या कुणी दिल्या. दागिने कुणी दिले. कुणी बिर्यान्या पाठविल्या. कुणी कोंबडी वडे पाठविले. तेवढच खाऊन फस्त करणारी ती आहे.ठाकरे गटातल्या महिला नेत्यांत गटबाजी सुरू झाल्याचं बोललं जातंय. एका गटात नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विशाखा राऊत यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात सुषमा अंधारे, रंजना घाडी आणि ज्योती ठाकरे यांचा समावेश आहे.या संभावित गटबाजीची दखल घेत काल उद्धव ठाकरे यांची चर्चा केल्याचं बोललं जातंय. आपआपसातल्या स्पर्धेमुळं आपण चांगली माणसं गमावतोय. अशी भावना महिला नेत्यांच्या बैठकीत मांडल्याचं सांगितलं जातंय. 

Google Follow Image