Siddharth Jadhav : 'आपला सिद्धू' बनला गायक; ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘मेल्याहून मेल्यागत’ गाणं रिलीज

Abp News | 1 month ago | 27-06-2022 | 11:15 pm

Siddharth Jadhav : 'आपला सिद्धू' बनला गायक; ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘मेल्याहून मेल्यागत’ गाणं रिलीज

Siddharth Jadhav : संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) हा सिनेमा म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे. सध्या या सिनेमातील एक-एक पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेमगीत आणि रॅप साँगनंतर आता ‘मेल्याहून मेल्यागत’ हे सिद्धार्थ जाधववर चित्रीत गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मेल्याहून मेल्यागत’ हे गाणं क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे स्वतः सिद्धार्थ जाधवने गायले आहे. वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणारा सिद्धार्थ या गाण्याच्या माध्यमातून काहीतरी सांगू पाहात आहे. एखादे सत्य शोधण्यासाठीची त्याची धडपड या गाण्यातून दिसत आहे. या गाण्याबद्दल संगीतकार पंकज पडघन म्हणाले, ‘तमाशा लाईव्ह’ हा एक सांगितिक सिनेमा असल्याने या गाण्यांच्या माध्यमातून कथा पुढे जाणारी आहे. त्यामुळे या कथानकाला साजेसे आणि दमदार संगीत असणे आवश्यक होते. या गाण्याच्या निमित्ताने सिद्धार्थ प्रथमच गाणं गायला असून त्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित‘तमाशा लाईव्ह’ हा सिनेमा 15 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या सिनेमाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. प्रेक्षक आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. संबंधित बातम्या

Google Follow Image