'यशस्वी' जैस्वाल, या दिग्गज खेळाडूला सोडलं मागे

Tv 9 | 1 week ago | 23-09-2022 | 10:05 pm

'यशस्वी' जैस्वाल, या दिग्गज खेळाडूला सोडलं मागे

नवी दिल्ली :  दुलीप ट्रॉफीच्या (Duleep Trophy) अंतिम फेरीत पश्चिम विभागाचा सामना दक्षिण विभागाशी होतोय. ही स्पर्धा कोईम्बतूरमध्ये खेळवली जातेय. या सामन्यात पश्चिम विभागानं आपली स्थिती मजबूत केलीय. यात एक विशेष कामगिरी घडली. यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताचा माजी कर्णधार अजित वाडेकरांचा (Ajit Wadekar) विक्रम मोडलाय. पहिल्या श्रेणी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा जैस्वाल हा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरलाय.यशस्वीनं वयाच्या 20 वर्षे 269 दिवसांत हे काम केलंय. वाडेकर यांनी वयाच्या 20 वर्षे 354 दिवसांत हे काम केलंय. 1962 मध्ये बॉम्बेकडून राजस्थानविरुद्ध खेळताना त्याने शतक झळकावलं होतं.जैस्वालनं नाबाद 209 धावांवर सामन्याचा तिसरा दिवस संपवला. सर्फराज खान 30 धावा करून नाबाद राहिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पश्चिम विभागाने तीन गडी गमावून 376 धावा केल्या आणि दक्षिण विभागावरील आपली आघाडी 319 धावांपर्यंत वाढवली.दिवसाची सुरुवात दक्षिण विभागाकडून करण्यात आली. त्यावेळी त्यांची धावसंख्या सात गडी गमावून 318 धावा होती. पण अवघ्या नऊ धावांत त्याने उर्वरित तीन विकेट गमावल्या आणि पहिल्या डावात 327 धावांत गुंडाळले.पश्चिम विभागाची फलंदाजी आली आणि सलामीवीर जयस्वालनं सुरुवातीपासूनच दक्षिण विभागाच्या गोलंदाजांची कडवी परीक्षा घेतली. त्यानं वेगाने धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत जयस्वालनं 244 चेंडू खेळले असून 23 चौकार आणि तीन षटकार ठोकले आहेत.श्रेयस अय्यरनेही शानदार खेळी करत अर्धशतक झळकावलंय. त्यानं 113 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 71 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे 15 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही.जैस्वाल आणि अय्यर हे दोघेही पहिल्या डावात अपयशी ठरले. जैस्वालला एकच धाव करता आली. त्यानंतर अय्यरच्या बॅटमधून 37 धावा आल्या. हेत पटेलने 98 धावा करत पश्चिम विभागाला पहिल्या डावात 270 धावांपर्यंत नेले.

Google Follow Image