Suresh Kalmadi Pune PMC:  सुरेश कलमाडी यांची पुणे महापालिकेत 10 वर्षांनी एंन्ट्री, पाहा काय म्हणाले कलमाडी?

Abp News | 1 week ago | 05-08-2022 | 04:04 pm

Suresh Kalmadi Pune PMC:  सुरेश कलमाडी यांची पुणे महापालिकेत 10 वर्षांनी एंन्ट्री, पाहा काय म्हणाले कलमाडी?

Suresh Kalmadi Pune PMC:  काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी (Congress Leader Suresh Kalmadi) पुणे महापालिकेत  आले होते. त्यांच्या येण्याने अनेकजण अवाक झाले होते. तब्बल 10 वर्षांनी त्यांनी महापालिकेत एन्ट्री घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कलमाडी हे पुण्याच्या राजकारणातील मोठे नाव होते. पुण्याचे खासदार देखील होते. त्याकाळात त्यांनी  शहरात चांगले कामं केली होती. मात्र काही वर्ष झाले ते राजकारणात सक्रिय नाही आहे. पालिकेत येऊन त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. तब्बल 10 वर्षांनी महापालिकेत आलो आहो. काही परवानग्या हव्या आहेत आणि यापुढे देखील महापालिकेत येत राहीन, असं त्यांनी सांगितलं आहे. पुणे फेस्टिव्हलच्या कामासाठी एन्ट्रीदोन वर्षांनंतर पुणे फेस्टिव्हल मोठ्या जोशात आणि जोमात होणार आहे.  गेल्या 32 वर्षांची पुणे फेस्टिव्हलला परंपरा आहे. त्यांच्याच विविध कामांसाठी आणि परवानग्यांसाठी त्यांनी महापालिकेला भेट दिली होती. 5 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान हे फेस्टिव्हल होणार आहे. गणेश कला क्रिडामध्ये हे फेस्टिव्हल होणार आहे. त्यासोबतच बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.नाट्यगृहाच्या मार्गांवरचे खड्डे बुजवाबालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गणेश कला क्रिडा या सगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.  पुणे फेस्टिव्हलच्या आधी हे सगळे मार्ग चांगले करावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना केली आहे. अरविंद शिंदे, रमेश बागवे आणि इतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. सगळे पक्ष मोठ्या जोमात कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीकडून महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा रद्द करुन शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या सरकारला धक्का दिला आहे. त्यावरुन घमासान सुरु असताना तब्बल 10 वर्षांनी काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी पालिकेला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्याचं चित्र आहे.

Google Follow Image