TET, MHADA Exam Scam: म्हाडा, आरोग्य आणि टी. ई. टी. घोटाळ्याचा तपास ईडीकडे जाण्याची शक्यता

Abp News | 4 days ago | 06-08-2022 | 11:15 am

TET, MHADA Exam Scam: म्हाडा, आरोग्य आणि टी. ई. टी. घोटाळ्याचा तपास ईडीकडे जाण्याची शक्यता

TET, MHADA Exam Scam: महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे.  पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टी ई टी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्र ईडीच्या ताब्यात सोपवली आहेत.राज्यातील आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करताना पुणे सायबर पोलीसांना म्हाडा परिक्षेचा पेपर फुटल्याच समजलं होतं.  तर म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टी. ई. टी. परिक्षेत गैरव्यवहार झाल्याच समोर आलं होतं. दोन दिवसांपुर्वी 2019 साली झालेल्या टी. ई. टी. अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होतं.  महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईदेखील होणार असल्याचं सांगितलं होतं. 2019 ला 16 हजार 705 विद्यार्थ्यांनी टी ई टी परिक्षा दिली होती.त्यापैकी 7800 विद्यार्थ्यां पैसै देऊन परिक्षा पास झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणार्‍या शिक्षकांचं धाबं दणाणलं आहे.म्हाडा परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला होता. या प्रकरणाचा तपास करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली होती. याबाबत समितीने पुणे सायबर पोलिसांना पत्र सुद्धा लिहिलं होतं. शिवाय परीक्षा केंद्रावर घडलेल्या गैरप्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आणलं होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता ईडी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER