मोठ्या बहिणीने लहान बहिणीला संपवले, कारण ऐकून थक्क व्हाल !

Tv 9 | 1 month ago | 07-10-2022 | 03:05 am

मोठ्या बहिणीने लहान बहिणीला संपवले, कारण ऐकून थक्क व्हाल !

मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी : प्रेम प्रकारणाबद्दल घरच्यांना माहिती दिली तसेच प्रियकरासोबत पळून जाण्यास‌ विरोध केल्याच्या रागातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या (Sister Killed Sister) केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon Ahmednagar) येथे घडली आहे. हत्या करुन आत्महत्या केल्याचे दर्शवण्यात आले होते. मात्र पोलीस तापासात आरोपी बहिणीचे बिंग फुटले. कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या (Police Arrested Sister) ठोकल्या आहेत.अहमदनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात 30 सप्टेंबर रोजी 17 वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्याच घरात लटकलेला आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे भासत होते.मात्र तपासाअंती आत्महत्या नसून हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता मुलीच्या मोठ्या बहिणीनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले.याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या बहिणीला अटक केली आहे. तिची चौकशी केली असता तिने हत्येची कबुली देत कारणही स्पष्ट केले. सृष्टी बनकर असे 19 वर्षीय आरोपी बहिणीचे नाव आहे.सृष्टी हिचे श्रीरामपूर तालुक्यातीलआकाश कांगुणे नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती त्या तरुणासोबत पळून जाऊन लग्न करणार होती. मात्र ही बाब लहान बहिणीला कळाली आणि तिने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला.यानंतर घरच्यांनी तिला समज दिली होती तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती. त्यातूनच प्रेमात आंधळी झालेल्या मुलीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता बहिणीची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

Google Follow Image