Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 06 ऑगस्ट 2022 : शनिवार : एबीपी माझा

Abp News | 4 days ago | 06-08-2022 | 08:07 am

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 06 ऑगस्ट 2022 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.1. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनियाची सोनेरी कामगिरी... 26 पदकांसह भारत पाचव्या स्थानी... देशभरात आनंदाचं वातावरणIndia in Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत सहा पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकं खिशात घालत आहेत.यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सच्या अप्रतिम कामगिरीनंतर आता कुस्तीपटूंनीही विशेष कामगिरी केली. भारताच्या सहाच्या सहा कुस्तीपटूंनी पदकावर नाव कोरलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 26 वर गेली आहे. तसंच लॉन बाऊल्समध्ये पुरुषांच्या गटाने इंग्लंडला 13-12 ने मात देत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे.2. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाचं जोरदार कमॅबक, विविध भागात मुसळधार पावसाची हजेरी तर पुढील 24 तासात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला अलर्ट3. उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, जगदीप धनखड आणि मार्गारेट अल्वा यांच्यात लढत, मतदानाला सुरुवात4. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आजपासून दिल्ली दौऱ्यावर, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्ली दरबारी खलबतं होण्याची शक्यता, तर निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार5.  संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांची आज ईडी चौकशी, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी  हजर राहण्याचे समन्स6. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात मोठा वाटा, दीपक केसरकरांचा आरोप7. मदतीच्या बहाण्यानं महिलेवर सामूहिक अत्याचार; पीडिता गंभीर, नागपुरात उपचार, प्रत्येक श्वासासाठी झुंज8.TET घोटाळ्यात आरोप ठेवण्यात आलेले IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांचं निलंबन रद्द, पुन्हा प्रशासकीय सेवेत रुजू9. सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्यानं खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याचा अंदाज10. धुळ्यातील महापालिकेच्या शाळेत पाणी साचलं, शिक्षण 'पाण्यात'; विद्यार्थ्यांवर आली आंदोलनाची वेळ

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER