Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 23 जून 2022 : गुरुवार : एबीपी माझा

Abp News | 5 days ago | 23-06-2022 | 10:45 am

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 23 जून 2022 : गुरुवार : एबीपी माझा

1. कुणाला ठेवायचं कुणाला काढायचं हे ठरवा, सुनील प्रभूंपासून सुरुवात करा, शिंदे गटाचे प्रतोद गोगावले आणि प्रताप सरनाईकांमधलं संभाषण कॅमेऱ्यात कैद2. वर्षां बंगला सोडताना मुख्यमंत्री आणि रश्मी ठाकरे भावूक, मातोश्रीपर्यंतच्या प्रवासादरम्यान शिवसैनिकांकडून फुलांचा वर्षाव, अनेकांना अश्रू अनावर3. मुख्यमंत्रीपद सोडा हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन, मविआतून बाहेर पडण्यावर एकनाथ शिंदे ठाम4. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीचं भलं तर शिवसैनिकांचं खच्चीकरण, मुख्यमंत्र्यांच्या परत येण्याच्या आवाहनानंतर शिंदेंचं ट्वीट5. उद्धव ठाकरेंशी बंड पुकारून नवा गट स्थापन करणाऱ्या शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, सूत्रांची माहिती, काल दिवसभर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर खलबतंपाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 23 जून 2022 : बुधवार6. ठाकरेंनी वर्षा बंगला सोडल्यानं राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा, उशीरा रात्री अजित पवारांच्या घरी खलबतं, बंडामागे सेनेतल्या आणखी एका बड्या नेत्याचा हात असल्याचा संशय7. समोरून मागा राजीनामा देईन, वर्षा बंगला सोडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं आवाहन, बहुमत सिद्ध करू, संजय राऊतांना विश्वास8. गुलाबराव पाटील, योगेश कदम, मुक्ताई नगरचे चंद्रकांत पाटील गुवाहाटीत, तर कृषीमंत्री दादा भुसेंसह आणखी सहा जण गुवाहाटीच्या वाटेवर, सूत्रांची माहिती एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी संपर्क झालेला नाही. मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. त्यामुळे आता सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे.9. राष्ट्रवादी आणि काँग्रसेच्या बड्या नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट, ठाकरेंसोबत असल्याचा दिला विश्वास, भेटीवेळी अजित पवार अनुपस्थित 10. अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, भूकंपात 1 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू तर 600 हून अधिक जखमी

Google Follow Image