Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 24 जून 2022 : शुक्रवार : एबीपी माझा

Abp News | 1 day ago | 24-06-2022 | 08:41 am

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 24 जून 2022 : शुक्रवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.1. धमक्यांना घाबरत नाही, बंडखोर 12 आमदारांवर कारवाई करण्याच्या सेनेच्या मागणीला शिंदेंचं उत्तर, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा काढण्यासंदर्भात शिंदे राज्यपालांना पत्र पाठवणार, सूत्रांची माहिती 2. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर दिल्लीत खलबतं, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती, देवेंद्र फडणवीसही दिल्लीत3. महाशक्तीचा पाठिंबा असल्यानं घाबरायची गरज नाही,एकनाथ शिंदेंकडून बंडखोर आमदारांना ग्वाही, बंडामागे भाजपची रसद असल्याच्या चर्चांना उधाण4. दादा भुसेंच्या रुपात सातवा मंत्री शिंदेंच्या गटात, संजय राठोड, रवींद्र फाटक, गीता जैन आणि किशोर जोरगेवारही गुवाहाटीतल्या हॉटेल मुक्कामी5. बंडखोर मुंबईत आल्यानंतर भाजपचं मार्गदर्शन मिळतं का बघू, शरद पवारांचं सूचक वक्तव्य, तर बंडामागे भाजप नसल्याचा अजित पवारांचा तर्क 6. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा, अजित पवारांचा दावा .. निधीबाबत पक्षपात केल्याचा नाना पटोलेंचा दावाही फेटाळला..7. शिवसेना जिल्हा आणि तालुका प्रमुखांना शिवसेना भवनात हजर राहण्याचे आदेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन संवाद साधणार 8. सलग चौथ्या दिवशी अनिल परबांची ईडी चौकशी, शिवसेना दुहेरी संकटातAnil Parab ED Inquiry : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचे ढग गडद होत चालले आहेत. अशातच शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेना आमदारांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. अनेक आमदार ईडी (ED) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या भितीमुळे शिंदे गटात सामील होत असल्याचं बोललं जात आहेत. तसेच, सत्ताधाऱ्यांकडूनही असेच आरोप केले जात आहे. एकिकडे शिवसेनेला (Shivsena) मोठं खिंडार पडलंय, तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) गेले तीन दिवस ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. काल (गुरुवारी) अनिल परबांची सलग तिसऱ्या दिवशी सहा तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. तर परबांना आज 11 वाजता पुन्हा चौकशीला बोलवण्यात आलं आहे. आज सलग चौथ्या दिवशी दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची ईडी चौकशी होणार आहे. 9. कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान 10. महाबीजचे प्रमाणित बियाणं अनुदानीत दरात उपलब्ध, शेतकऱ्यांना लाभ घेण्याचं आवाहन

Google Follow Image