Uday Samant : तीन सदस्यीय प्रभाग रचना का बदलली ?, उदय सामंत यांचा महाविकास आघाडीला सवाल

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 05:06 pm

Uday Samant : तीन सदस्यीय प्रभाग रचना का बदलली ?, उदय सामंत यांचा महाविकास आघाडीला सवाल

Uday Samant : ठाकरे सरकार असताना ऑक्टोबरमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना निर्णय कॅबिनेटमध्ये झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतखाली निर्णय झाला होता. काल याच निर्णयात बदल झालेला आहे. जनतेस वेठीस धरल्याचा संभ्रम पसरलेला जातोय. 2021 मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला. तेव्हा एकनाथ शिंदे हे एकमेव मंत्री विरोध करणारे होते. चार का असू नयेत व तीन का असावेत? यावर चर्चा झाली. पण ही पद्धत योग्य नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी मांडले होते. तरीही तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला. मात्र तो आता शिंदे फडणवीस सरकारने बदललेला आहे, असे उदय सामंत म्हणाले.त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असल्याने मविआ सरकारने हा फायदा घेतला. राष्ट्रवादी व काँग्रेसने उद्धव ठाकरे यांचा फायदा घेतला. नगरविकास खात्यामार्फंत हा प्रस्ताव येण्याचा नियम मुख्य सचिव संबंधित मंत्र्यांकडे पाठवतात. त्यानंतर प्रस्ताव कॅबीनेटसमोर येतो तसंच झालं. त्यामुळे शिवसेनेवर हा अन्याय होता. निर्णय आता बदलण्यात आलेला आहे, तीन ऐवजी चार तीन सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. मुंबई व काही ठिकाणी प्रभाग फेरबदल आपले प्रभाग एकमेकांमध्ये गेले होते.याबाबत पारदर्शकता मिळावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असं पत्रकार परिषद घेत आज उदय सामंत यांनी सांगितले.शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले आरोपाबद्दल भाष्य केलं. यावर उदय सामंत यांनी म्हटले की आम्ही आजही त्यांचा आदर करतो. ती आमची संस्कृती आहे. त्यामुळेच दीपक केसरकर यांनी आज आपल्या बोलण्यातून आदित्य ठाकरे यांच्या बद्दलचा आदर आणि सुसंस्कृतपणा दाखवला.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिंदे गटातील आमदार व खासदारांच्या जाहिराती नाकारण्यात आल्या होत्या. मात्र आज जितेंद्र आव्हाड यांची मुख्य पानावर जाहिरात घेण्यात आली, यावर बोलताना उदय सामंत म्हटले की, राहुल शेवाळेंची जाहिरात अडचणीची वाटली असेल, जितेंद्र आव्हाड यांची जाहिरात संघटना वाढवणारी वाटली असेल. त्याचा निर्णय ते घेतात त्याच प्रकारे घेतला असेल. ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, कोणत्या पदाने तेजस ठाकरे राजकारणात येतील, याची माहिती नाही. पण, असं होत असेल तर आनंद आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना म्हणाले की लवकरच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतील. 15 ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल. 15 ऑगस्टला सर्व मंत्री आपल्या भागात झेंडावंदन करतील.

Google Follow Image