Uddhav Thackeray : बंडावर उद्धव ठाकरे काय बोलणार? पाच वाजता जनतेशी संवाद साधणार

Abp News | 5 days ago | 22-06-2022 | 04:37 pm

Uddhav Thackeray : बंडावर उद्धव ठाकरे काय बोलणार? पाच वाजता जनतेशी संवाद साधणार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पाच वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावर शिवसेनेकडून आमदारांच्या बैठकीसंबधी एक पत्र जाहीर करण्यात आलं होतं. पण ते अवैध असल्याचं सांगत एकनाथ शिंदेनी आमदार भरत गोगावले हे पक्ष प्रतोद असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे बंडखोर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता उभी फूट पडल्याचं दिसून येतंय. आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून ते यावेळी काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल होणारी भेट टळली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हानशिवसेना पक्ष प्रतोदपदी आता आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात असल्याची माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी एक आदेश काढला होता. तो आदेश अवैध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना पत्र पाठवलं आहे. हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या पत्रातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगितलं आहे.  

Google Follow Image