Uddhav Thackeray : मी ज्यांना माझं मानतो, त्यांच्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवणं: उद्धव ठाकरे

Abp News | 5 days ago | 22-06-2022 | 06:22 pm

Uddhav Thackeray : मी ज्यांना माझं मानतो, त्यांच्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवणं: उद्धव ठाकरे

मुंबई: मी ज्यांना माझे मानतो, त्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आज थेट लोकांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी बंडखोर आमदारांना साद घातली. तुम्हाला मी मुख्यमंत्री पदी नको असेल तर तोंडावर सांगा, आजच राजीनामा देतो असंही ते म्हणाले. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर...उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबुरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन."पक्षप्रमुख म्हणून मी राजीनामा द्यायला तयारउद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे... त्यानी मला थेट सांगावं. हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे."पक्षप्रमुख म्हणून मी राजीनामा द्यायला तयारउद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे... त्यानी मला थेट सांगावं. हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे."गायब आमदारांनी माझं हे लाईव्ह पाहावं आणि मला सांगावं, मी पद सोडेन असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, "मी नको असेल तर तोंडावर सांगाव. मी ज्यांना माझे मानतो, त्यापैकी कितीजण तिकडे गेले. त्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मत केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं असेल. त्यामुळे त्यांच्यापैकी एकानेही सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या, मी तयार आहे. समोर या आणि सांगा की तुम्ही मुख्यमंत्री असल्याने आम्हाला संकोच वाटतोय. मी पद सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाही. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो."

Google Follow Image