Abp News | 1 week ago | 05-08-2022 | 07:17 am
Varsha Raut Property Details : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने (ED) आज चौकशीसाठी बोलावलं आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं वर्षा राऊत यांना समन्स बजावलं आहे. घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या (ED) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावरून झालेल्या व्यवहाराबाबत चौकशीसाठी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या अलिबागमधील मालमत्तेची माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि इतरांच्या नावे 10 ठिकाणी एकूण 36.86 चौरस मीटर जमीन खरेदी करण्यात आली आहे.पहिली जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - मार्च 2012विक्रेत्याचे नाव - अविनाश देशपांडे आणि दीपाली देशपांडेखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - सात लाख रुपयेदुसरी जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 03-05-2010विक्रेत्याचे नाव - गिरीश शुक्ला आणि सुलोचना शुक्लाखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - सहा लाख तीस हजारतिसरी आणि चौथी मालमत्ता खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 03 मे 2010विक्रेत्याचे नाव - दिलीप खळेखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - तेरा लाख ऐंशी हजारपाचवी जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 01 जून 2011विक्रेत्याचे नाव - श्रीधर आंदेकरखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - सात लाख रुपयेसहावी जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 16 मार्च 2012विक्रेत्याचे नाव- अविनाश देशपांडे आणि दीपाली देशपांडेखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - दहा लाख रुपयेसातवी आणि आठवी जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 06 फेब्रुवारी 2010वाचलेल्या व्यक्तीचे नाव- अभय मालप, कल्पना मालप, संजना मालप आणि अंकिता मालपखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - आठ लाख 9 हजार