Varun Dhawan | 'वरुण धवन'चे पहिले क्रश आणि पहिला पगार नेमका किती?, जाणून घ्या

Tv 9 | 3 days ago | 24-11-2022 | 05:05 pm

Varun Dhawan | 'वरुण धवन'चे पहिले क्रश आणि पहिला पगार नेमका किती?, जाणून घ्या

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या भेडिया या चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रिती सेनन आणि वरुण धवन सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बिझी आहेत. हा चित्रपट 25 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकत नसताना अजय देवगणचा चित्रपट जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. आता वरुण धवनचा भेडिया काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.वरुण धवनने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींवर मोठा खुलासा केला आहे. यामध्ये चक्क वरुण धवन याने आपले पहिले क्रश कोण होते आणि आपली पहिली पगार नेमकी किती होती, यावर मोठा खुलासा केला आहे.तुम्हाला ऐकून नक्कीच धक्का बसेल. परंतू स्वत: वरुण धवन याने सांगितले की, त्याची पहिली क्रश ही दुसरी तिसरी कोणी नसून सानिया मिर्झा ही होती. सानियाचा खूप जास्त मोठा फॅन हा वरुण धवन होता.आपल्या पहिल्या क्रशसोबतच वरुण धवन याने आपली पहिली पगार किती होती, यावर ही भाष्य केले आहे. तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल, परंतू हे खरे आहे की, वरुणची पहिली पगार ही 5000 रूपये होती.पुढे वरुण धवन म्हणाला की, सानिया मिर्झाला भेटण्याची माझी खूप अगोदरपासून इच्छा होती. परंतू आमची पहिली भेट ही फार जास्त खास आणि चांगलीच नक्कीच झाली नाहीये.आम्ही एका जाहिरातीच्या शूट वेळी पहिल्यांदा भेटलो. यावेळी मला सानियाने येताना अ‍ॅपल आणायला सांगितले होते. मग मी घेऊन गेलो. परंतू यावेळी मी खूप जास्त घाबरलेला होतो. सानियाला काय बोलायचे काय नाही हे सर्व विचार माझ्या मनात सुरू होते.मी सानियाने सांगितल्याप्रमाणे अ‍ॅपल घेऊन गेला होतो. परंतू तिला ते देण्याची माझी हिंम्मतच होत नव्हती. मग तिथे सानियाची आई होती आणि मग मी हे घाबरत घाबरत त्यांना देण्याचा प्रयत्न केला.मी अ‍ॅपल सानियाच्या आईला देत असताना त्यांनी सांगितले की, सानिया अ‍ॅपल खात नाही आणि तिला ते आवडत देखील नाहीत. तुला हे कोणी आणायला सांगितले? असे म्हणत त्या मला ओरडल्या. परंतू तेवढ्यात तिथे सानिया आली आणि तिने हा सर्व विषय व्यवस्थित हाताळला.

Google Follow Image