'या' कारणांनी शिवसेना आमदारांनी बंड पुकारले; शिरसाट यांच्या पत्रातील प्रमुख दहा मुद्दे

Abp News | 5 days ago | 23-06-2022 | 03:24 pm

'या' कारणांनी शिवसेना आमदारांनी बंड पुकारले; शिरसाट यांच्या पत्रातील प्रमुख दहा मुद्दे

Maharashtra politics: एकनाथ शिंदे यानी पुकारलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. मात्र एवढ्या मोठ्याप्रमाणावर शिवसेनेचे आमदार फुटले कसे असा प्रश्न अनेकांना पडत होता. आणि याच प्रश्नाचे उत्तर आता औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहे. शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले असून, त्यातून आमदारांची व्यथा मांडली आहे. शिरसाट यांनी पाठवलेल्या पत्रातील प्रमुख दहा मुद्दे नेमके काय आहेत पाहू यात...शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातील प्रमुख दहा मुद्दे कोण आहेत शिरसाट...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणारे संजय शिरसाट यांचा राजकीय इतिहास खूपच संघर्षाचा आहे. शिरसाट यांच्या खांद्यावर जेव्हा घरची जवाबदारी आली त्यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजीपाला विकला, गॅसचे फुगे विकले. त्यानंतर 7 रुपये रोजंदारीवर एका कंपनीत काम केलं. पुढे ते ऑटो रिक्षाचालकाचं काम करू लागले. दरम्यान याच काळात ते शिवसेनेशी जोडले गेले. पुढे  2000 मध्ये महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले. सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी पक्षात आपली छाप पाडली. त्यामध्ये त्यांनी सभागृह नेतेपद भूषवले. 2009 मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात त्यांनी आमदारकी लढवत विजय मिळवला. त्यानंतर सलग तीनवेळा आमदार म्हणून ते निवडून आले. 

Google Follow Image